Bajrang Sonawane : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात; जखमींवर उपचार सुरू

Bajrang Sonawane : बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला मंगळवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला पाठीमागून धडकली. या अपघातात काहीजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धुळे-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली.

सुदैवाने या अपघातात बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ते सुखरुप असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

Pune Loksabha Congress : काँग्रेसवर 'हाता'ने अपयशाची वेळ

या पराभवानंतर बजरंग सोनवणे मंगळवारी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथे गेले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी होते. तेथून परतत असताना ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला येऊन धडकली.

सुदैवाने या घटनेत बजरंग सोनवने यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी तुमच्या आशीर्वादाने सुखरुप असून कोणतेही चिंता करण्याचं कारण नाही, असं सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply