Bajar Samiti : दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती; राज्यात नव्या ६५ बाजार समित्यांना मंजुरी

Solapur : सोलापूर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत ६५ नवीन बाजार समित्या मंजूर केल्या आहेत. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे. यामुळे सोलापूरच्या बाजार समितीमध्ये खरेदी- विक्री साठीचा भार कमी होणार आहे. हि प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाजार समिती सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. अशा ठिकाणी नवीन बाजार समिती सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २१ जिल्ह्यांमध्ये ६५ बाजार समित्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जवळच्या बाजार समित्यांवर येणार भार कमी होणार असून शेतकऱ्यांना देखील वाहतुकीसाठी लागणार खर्च कमी होणार आहे.

निवणुकीच्या धामधुमीतच बाजार समितीला मंजुरी दरम्यान सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून,या बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे दोन तालुके आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागातील १५ विकास संस्थांचा समावेश आहे. या बाजार समितीची निवडणूक सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत नवीन ६५ बाजार समित्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.

Ranjit Kasale : मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात

२१ जिल्ह्यात वाढणार बाजार समिती

राज्यात या पूर्वी ३०५ बाजार समिती आणि ६२५ उपबाजार कार्यरत आहेत. मात्र आतापर्यंत ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नव्हत्या. यामुळे आता ६५ तालुक्यांमध्ये बाजार समिती सुरु करण्यात येणार आहे. यात दक्षिण सोलापूरचा समावेश आहे. तर उर्वरित २१ जिल्ह्यापैकी सिन्धुदुर्ग जिल्ह्यात ७, रत्नागिरी ८, रायगड ६, पालघर ५, जळगाव ३, सांगली ३, गडचिरोली ७, कोल्हापूर ८, नाशिक, अमरावती, नागपूर, भंडारा, संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी २, ठाणे, पुणे, गोंदिया, नांदेड आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी १ बाजार समिती होणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply