Badrinath Landslide : उत्तराखंड जोशीमठजवळ दरड कोसळली, बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प; बद्रीनाथमधले हजारो पर्यटक अडकले, एकाचा मृत्यू

Badrinath Landslide : उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जोशीमठजवळील हेलांग खोऱ्यात जलविद्युत प्रकल्पासाठी एनटीपीसीचा बोगदा बांधला जात आहे. काल दरीत खाली काही बांधकाम सुरू असताना स्फोट झाला, त्यानंतर डोंगराचा एक भाग तुटून रस्त्यावर पडला, असा दावा केला जात आहे

या घटनेनंतर चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना अडवण्यात आले आहे. महामार्गावर भूस्खलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. महामार्ग बंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाहतुक ठप्प झाली आहे. हजारो प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत.

ढिगाऱ्याखाली सापडल्याने कारमधून प्रवास करणारे चंदीगड येथील दोन प्रवासी जखमी झाले. त्याचवेळी हनुमान चाटी येथे डोंगरावरून दगड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. रस्त्यावरील ढिगारा हटवण्यासाठी दोन जेसीबी मशिन वापरण्यात आल्या आहेत. रात्रीपर्यंत महामार्ग सुरळीत असेल. यात्रेकरूंनी प्रवासाचे अपडेट मिळताच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन एसपी चमोली प्रमेंद्र डोवाल केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply