Badlapur News : बदलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार! २६० कोटींची पाणीपुरवठा योजना

Badlapur News : बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. आता बदलापुरसाठी 74 किमी लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार आहे.पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बदलापूरचा 2056 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर शहरात होत असलेली पाणीबाणी अखेर संपणार आहे. कारण राज्य सरकारने नगरोत्थान योजनेतून बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केलीय. यासाठी आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे प्रयत्नशील होते. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत 260 कोटींच्या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Vaishnavi Hagawane : स्पाय कॅमेऱ्यानं बायकोचे बेडरूममधील VIDEO शूट करायचा अन्..; हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणकडून बायकोचा छळ

बदलापूर शहराची लोकसंख्या जवळपास साडेचार लाख असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. बदलापूरला वाढीव पाणीपुरवठा योजना मिळावी, यासाठी बदलापुरातील आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या बदलापूर दौऱ्यात बदलापूरची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर राज्य सरकारने 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून बदलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय. या योजनेअंतर्गत बदलापुरात 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून 14 जलकुंभ उभारले जाणार आहेत. यामुळे पुढची अनेक वर्षे बदलापूरकरांना पाण्याची टंचाई भासणार नाही.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply