Badlapur News : तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; बदलापूरच्या पूरनियंत्रण रेषा बाधितांचा इशारा

Badlapur News : बदलापूरमधील पूरनियंत्रण रेषा बाधित असलेल्या शेतकरी, स्थानिक नागरिक, सोसायट्यांची पदाधिकारी गुरुवारपासून कुळगांव- बदलापूर  नगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. दरम्यान बदलापूरमधील पूरनियंत्रण रेषा बाधितांनी  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर  बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. 

कुळगांव-नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या  आजूबाजूला दीड किलोमीटर लांबपर्यंत पूर नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे. जलसंपदा विभागांना ही पूर नियंत्रण रेषा आखताना स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यावसायिक आणि प्रशासन यापैकी कोणालाच विश्वासात न घेता थेट पूर नियंत्रण रेषा टाकली आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि रहिवासी यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत.

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीनाट्य

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. असे असताना देखील हा विषय मार्गी लागत नसल्याने येथील नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व समितीचे पदाधिकारी शरद म्हात्रे यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपोषणकर्त्यां पूर नियंत्रण रेषा बाधित शेतकरी व स्थानिक रहिवासी संघर्ष समितीने दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply