Badlapur Fire : बदलापुरात इमारतीला भीषण आग; घरातील साहित्य जळून खाक

Badlapur Fire : बदलापुरातील शिरगावमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावरील घराला आग लागली. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार,बदलापूरच्या शिरगाव परिसरात वेदांत वाटिका या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या एका घराला भीषण आग लागली होती. घराला लागलेल्या आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले.

Pune Crime : निवृत्त महिला अधिकाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा गंडा

या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात आग लागली. त्यामुळे या घराच्या वरच्या मजल्यावरील दोन घरांना आगीची झळ पोहोचली आहे. आग लागल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने इमारत तातडीने रिकामी करण्यात आली होती.

आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत घराचं मोठं नुकसान झालं. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply