Bacchu Kadu : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी, मंत्रिपदाचा दर्जा जाहीर

Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना दिलेला शब्द पाळला आहे. अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे.

आमदार बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या 'दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी' या लोककल्याणमारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. शासनाने परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला. गेल्या 20 वर्षांपासून दिव्यांगांसाठी बच्चू कडू लढत आहेत.

यामध्ये राज्यस्तरीय सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे, उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय हे सदस्य म्हणून काम पाहतील.

तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ही जिल्ह्याची समिती असेल.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान संपूर्ण राज्यासह जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी राज्यासह जिल्ह्यामध्ये समिती गठित केली जाईल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply