Ayodhya Poul : ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर शाईफेक, घटनेनंतर अयोध्या पौळ यांची संतप्त प्रतिक्रिया

Ayodhya Poul : ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अयोध्या पोळ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी शाईफेकनंतरचे काही फोटोही पोस्ट केले. 

अयोध्या पौळ यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात एका महिलेवर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर अयोध्या पौळ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला बोलावण्यात आलं होतं. इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली. इथे आल्यावर बॅनर वेगळाच होता पण कार्यक्रमातून निघणं योग्य नसल्याने मी तिथे थांबले.

या कार्यक्रमात मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले आणि त्यावेळी एक महिला तिथे आली आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.

मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. हे सर्व षडयंत्र असून हा सर्व एका षडयंत्राचा भाग होता. षडयंत्र करूनच मला त्या कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं. मी सातत्याने सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत असते त्यामुळे मला टार्गेट करण्यात आलं. पण आम्ही अशा हल्ल्यांना घाबरत नाही. आम्ही आमचं काम सुरु ठेवणार, मी माझ्या पक्षाच्या अनेक कार्यक्रमाला गेले आहे. तेव्हा माझ्यासोबत अस काहीच घडलं नाही, असं अयोध्या पौळ यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर अयोध्या पोळ या चर्चेत आल्या होत्या. अयोध्या पोळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या आहेत. अयोध्या यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात.

अयोध्या यांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply