Avinash Jadhav : अविनाश जाधवांची पोलिसांसमोर सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला कानफटवलं,

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अविनाश जाधव यांच्या विरोधात शुक्रवारी मुंबईमधील झवेरी बाजारातील सराफा व्यापाराच्या मुलाला धमकावणे आणि ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांत गुन्हा नोंदविल्यानंतर अविनाश जाधव यांनी धमकावणे आणि मारहाणीचे आरोप फेटाळले. त्यानंतर आज अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचा थेट सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांसमोरच सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण केली. अविनाश जाधव यांनी पोलिसांसमोरच मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेप्रकरणी अविनाश जाधव आणि त्यांच्या मित्राविरोधात लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिस ठाण्यात खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

Rohit Vemula : रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

अविनाश जाधव यांच्यावर काय आरोप आहेत?

अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी दादरच्या झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याने बोलावले होते. त्यावेळी अविनाश जाधव देखील सोबत होते. यावेळी काही वादानंतर अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केली. जाधव यांच्या विरोधात सराफा व्यापाऱ्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

जाधव यांनी उचलून नेण्याची धमकी दिली. तसेच नुकसान करण्याची धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी पोलिसांत तक्रार दिली. व्यापारी जैन यांनी पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला.

जाधव यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. सराफा व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केल्यानंतर जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply