अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ८ जूनपर्यंत CBI कोठडी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना विशेष सीबीआय न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावली आहे. त्यांना येस बँक आणि DHFL आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने २७ तारखेला अटक केलं होतं.

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना सत्र न्यायालयाने येत्या ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. त्यांना सीबीआयने येस बँक & DHFL आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २७ मे रोजी अटक केलं होतं. त्यानंतर सीबीआयने भोसले यांना न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर न्यायाधीश शिंगाडे यांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वरील निर्णय दिला. याआधी भोसले यांना सीबीआय गेस्ट हाऊसमध्ये तीन दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले होते. न्यायालयाचा हा आदेश म्हणजे अविनाश भोसले यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये तीन हजार ७०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यात राणा यांना ६०० कोटी रुपयांची मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर डीएचएफएलने भोसले यांच्याशी संबंधित कंपनीत पैसे वळते केले होते. त्याच्यासोबत बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडेही हे पेसै गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते. सीबीआयने केलेल्या तपासणीत गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळती करण्यात भोसले यांचा प्राथमिकदृष्टय़ा सहभाग आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply