Aus vs Nam T20 World Cup : फक्त 34 चेंडूत ऑस्ट्रेलियाने 'या' संघाला पाजलं पाणी; अन् थाटात मारली सुपर-8 एंट्री

Australia vs Namibia T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अँटिग्वाच्या मैदानावर बगटातील ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेलेला सामना अवघ्या 23 षटकांत संपला. या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आले.

ज्यात त्यांनी प्रथम गोलंदाजी करत नामिबियाच्या संघाला 17 षटकात केवळ 72 धावांवर रोखले. यानंतर, हे लक्ष्य 5.4 षटकांत केवळ 1 गडी गमावून पूर्ण केले आणि सुपर 8 साठी आपले स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात लेगस्पिनर अॅडम झाम्पाची गोलंदाजी अप्रतिम होती, ज्याने 4 षटकात केवळ 12 धावा देत एकूण 4 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात केवळ 34 चेंडूत 73 धावांचे लक्ष्य गाठले, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील चेंडूंनी दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला. पहिले स्थान 2014 मध्ये श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळवलेला सामना आहे.

T20 World Cup 2024 Super 8 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदललं समीकरण, 20 पैकी 2 संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, तर 2 जणांची जागी पक्की

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने 8 चेंडूत 20 धावा, ट्रॅव्हिस हेडने 17 चेंडूत नाबाद 34 आणि मिचेल मार्शने 9 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. ग्रुप स्टेजमध्ये एक सामना शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने सुपर 8 साठी आधीच आपली जागा निश्चित केली आहे. कांगारू संघाला आता शेवटचा गट सामना 16 जून रोजी स्कॉटलंड संघाविरुद्ध खेळायचा आहे.
2022 टी-20 वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाला सुपर 8 मध्ये स्थान मिळवणे आता खूप कठीण दिसत आहे, कारण त्याच्या ब गटातून ऑस्ट्रेलियाने आपले स्थान निश्चित केले आहे, तर स्कॉटलंड हा पात्र होण्याच्या शर्यतीतील दुसरा संघ आहे.

इंग्लंडचे सध्या 2 सामन्यांनंतर केवळ 2 गुण आहेत, तर स्कॉटलंडचे 3 सामन्यांनंतर 5 गुण आहेत, अशा स्थितीत इंग्लिश संघाला सुपर 8 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी पुढचे सर्व सामने जिंकावे लागतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply