औरंगाबाद : स्मार्ट सिटीतील १०९ रस्त्यांचा फुटणार नारळ

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील १०८ रस्त्यांची ३१७ कोटी रुपयांची कामे करण्याची निविदा अंतिम करण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश प्राप्त होताच कंत्राटदाराने रस्त्याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. आत्तापर्यंत ८३ रस्त्यांचे सर्वेक्षण झाले आहे. रस्त्यांची कामे मुंबई आयआयटीच्या देखरेखीखाली केली जाणार आहेत. त्यानुसार एक टीम लवकरच शहरात येणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीइओ आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

शहरातील १०८ रस्त्यांची ३१७ कोटींचा कामे करण्याची निविदा स्मार्ट सिटी अभियानामार्फत ३१ मार्चला अंतिम करण्यात आली आहे. निविदेचे तीन टप्पे करण्यात आली पण एकाच कंत्राटदाराने अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने निविदा घेतली आहे. ए. जी. कन्स्ट्रक्शनतर्फे रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. स्मार्ट सिटीतील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार याविषयी विचारणा केली असता श्री. पांडेय म्हणाले, रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे.

आतापर्यंत पॅकेज-१ अंतर्गत ३६ पैकी २७, पॅकेज-२ अंतर्गत ३५ पैकी २७ व पॅकेज-३ अंतर्गत ३९ पैकी २९ अशा ८३ रस्त्यांचे सर्वेक्षण झाले आहे. रस्त्यांची कामे मुंबई आयआयटीच्या देखरेखीखाली केली जाणार आहेत. त्यानुसार आयआयटीची टीम २८ मेला शहरात येणार आहे. ही टीम रस्त्यांची पाहणी रोडमॅप दिला जाणार आहे.

रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कामे सुरू कली जातील. उद्घाटनाची कमी शक्यता आहे. थेट लोकार्पणच होऊ शकते. कंत्राटदाराला नऊ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. यातील काही रस्ते छोटे आहेत. त्यामुळे काम एका महिन्यात पूर्ण होईल, असे श्री. पांडेय यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply