Attack On Ship: २२ भारतीय असलेल्या मर्चंट शिपवर मिसाईल हल्ला; भारतीय नौदलाचं आयएनएस तैनात

Attack On Ship : समुद्रामार्गे व्यापार करणाऱ्या जहाजांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. एडनच्या खाडीत समुद्रात एमवी मार्लिन लुआंडा नावाच्या जहाजावर मिसाईलने हल्ला झाल्याची घटना घडलीय. हे व्यापारी जहाज असून या जहाजात २२ भारतीय आणि १ बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती मिळालीय. या हल्लापासून बाचव करण्यासाठी व्यापारिक जहाज मार्लिन लुआंडाने आयएनएस विशाखापट्टणमकडून मदत मागितली होती. एडनच्या खाडीत एमव्ही मार्लिन लुआंडावर क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्तानंतर नौदलाने मदत पुरवली असल्याचं भारतीय नौदलाने सांगितले.

२६ जानेवारी रोजी रात्री 'मार्लिन लुआंडा'वरुन धोक्याचा कॉल मिळाला होता. त्यावरुन एडनच्या खाडीत आयएनएस विशाखापट्टणम् तैनात करण्यात आल्याचं भारतीय नौदलाने सांगितलं. दरम्यान मिसाईल हल्ल्यानंतर जहाजाला आग लागलीय, असं नौदालाने निवेदनातून सांगितले आहे. भारतीय नौदल व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि समुद्रातील लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाने कटिबद्ध आणि वचनबद्ध आहे. व्यापारी जहाजाला मदत पोहोचविण्यात येतेय. आयएनएस विशाखापट्टणम् याद्वारे अग्मिशमन उपकरणं तैनात करण्यात आली असल्याचंही नौदलाने म्हटलंय.

Vishwa Marathi Sammelan : 'मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा', 'विश्व मराठी संमेलन-२०२४' चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

इस्रायल-हमास संघर्षादरम्यान लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हुथी बंडखोरांनी हल्ले तीव्र केले आहेत. याच दरम्यान या जहाजावर हल्ला झालाय. ॲडमिरल आर हरी कुमार यांनी अशा सागरी घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान द गार्डियनच्या दाव्यानुसार, तेल जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुथी बंडखोरांनी स्वीकारलीय.

हुथीचे प्रवक्ते याह्या सारिया यांनी एका निवेदनात म्हटलंय, आमचा प्रहार थेट होता. युनायटेड स्टेटनेही एमव्ही मार्लिन लुआंडावरील हल्ल्याची पुष्टी केलीय. अमेरिका हुथीला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहे.अमेरिकेकडून इशारा देण्यात आल्यानंतरही लाल समुद्रात हुथीचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा दहशतवादी संघटनेच्या यादीत समावेश करण्यात आलाय.

हुथी या संघटनेला SDGT (Specially Designate Global Terrorist) च्या यादीतून फेब्रुवारी २०२१ मध्ये हटवण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांमध्ये हुथींचे यादीत नाव टाकले होते. बायडन प्रशासनाने फेब्रुवारी २०१२ मध्ये हुथीला या यादीतून काढून टाकले होते. मानवतावादी शोकांतिकेशी झुंजत असलेल्या येमेनमधील लोकांना आवश्यक मदत सामग्री पाठवता यावी यासाठी त्या संघटनेचे नाव या यादीतून बाहेर काढलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply