ATM Crime News : हातचलाखीने एटीएमची अदलाबदली करत लुबाडणूक; अंतरराज्य गुन्हेगारांना अटक

ATM Crime News : बँकेमध्ये एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या जेष्ठ नागरिक यांच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने अदलाबदली केली जात होती. यानंतर त्यांच्या बँक  खात्यातून पैसे काढणाऱ्या अंतरराज्य गुन्हेगारांना पोलिसांनी  अटक केली आहे. यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

एटीएममध्ये  फेरफार करून लूटमार करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जण ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवत. समोरच्या व्यक्तीची नजर  चुकवून एटीएम कार्डची  अदलाबदल करून संबंधितांच्या खात्यातून पैसे काढत असतं. याबाबत पोलिसात तक्रार काढलं करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. 

Unmesh Patil Join Shivsena UBT : अखेर उन्मेष पाटलांनी बांधलं शिवबंधन! जळगावमध्ये भाजपला ठाकरेचा दणका

७ गुन्ह्याची उकल 

दरम्यान गुन्हे शाखा कक्ष २ कडून या टोळीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वारंवार वापरल्या जाणाऱ्या एका कारच्या मदतीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून आणखी तिघे जण फरार आहेत. आरोपींची अधिक चौकशी केली असता एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply