ATM मधून आता स्मार्टफोन वापरुन काढता येतील पैसे; जाणून घ्या प्रोसेस

RBI New Cash Without Card Service 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सुरक्षित व्यवहारांसाठी कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या प्रक्रियेत, वापरकर्ते डेबिट आणि क्रेडिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकतील. यामुळे कार्ड फसवणूक रोखण्यास मदत होईल. तसेच, वापरकर्ते त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घरी विसरल्यास एटीएममधून पैसे काढू शकतील.

यामध्ये मोबाईल फोन वापरून एटीएममधून पैसे काढता येतात. मोबाईल ऑथेंटिकेशनद्वारे पैशांचे व्यवहार करता येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. पण कार्डलेस कॅश काढण्याची प्रणाली आल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून पैसे काढण्याची सुविधा बंद केली जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

कॅश काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता असणार नााहीये. तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीतही सूट मिळणार आहे. कार्ड सुविधेशिवाय रोख रकमेसाठी, वापरकर्त्यांना रजिस्टर्ड मोबाइल आणि UPI आयडीशी स्मार्टफोन जोडणे आवश्यक आहे.

कार्डशिवाय पैसे कसे काढायचे

  • कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी वापरकर्त्याला UPI आयडीची आवश्यकता असेल. यानंतर व्यवहाराचे UPI द्वारे ऑथेंटिकेट करावे लागतील.
  • जेव्हा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी एटीएम स्क्रीनवर दाखवलेला कार्डलेस विथड्रॉल पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. हा QR UPI अॅपच्या मदतीने स्कॅन करावा लागेल.
  • यानंतर यूजर्सला UPI पिन टाकावा लागेल. यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल.

टीप - कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सध्या काही बँकांवर उपलब्ध आहे जसे की ICICI आणि SBI बँक. ही सुविधा लवकरच इतर बँकांच्या एटीएममध्येही सुरू करण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी अॅपवरून एटीएममध्ये प्रवेश करता येतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply