Atal Setu : जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून उडी, नवी मुंबईत खळबळ

 

Atal Setu Navi Mumbai Latest News Update : जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टराने सोमवारी रात्री अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी घेऊन आयुष्य संपवण्याच प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९:४३ वाजता ही घडला घडली. एका ३२ वर्षीय डॉक्टरने खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित इसमाची ओळख डॉ. ओंकार भागवत कवितके (वय ३२, व्यवसाय: डॉक्टर, जे. जे. हॉस्पिटल, राहणार: अविनाश सोसायटी, कळंबोली) अशी झाली आहे.

एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती अटल सेतू नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिस आणि बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील ११.८०० किमी बिंदूवर त्यांना डॉ. कवितके यांची होंडा अमेझ कार (MH ४६ CM ६८३७) आणि एक iPhone आढळला. मोबाईलवरील संपर्कांद्वारे त्यांची ओळख पटली. डॉ. कवितके यांची बहीण कोमल प्रमोद लंबाते यांनी नातेवाइकांसह कळंबोली पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे.

MNS Protest : नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

या घटनेनंतर सागरी सुरक्षा विभागाची 'ध्रुवतारा' बोट, रेस्क्यू टीम आणि अॅम्बुलन्सच्या सहाय्याने खाडीत शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. अद्याप डॉ. कवितके यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणी काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अटल सेतूसारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशा घटना घडणे चिंताजनक आहे. पोलिस आणि बचाव पथक युद्धपातळीवर शोधकार्य करत असून, लवकरच याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय डॉक्टरने उडी का मारली? याबाबतचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *