Asia Cup 2023 : भारताचा पाकिस्तान वर आता पर्यंत चा सर्वात मोठा विजय . 228 धावांनी विजय ,

मुंबई :- भारत - पाकिस्तान सामन्यात राखीव दिवशी भारताने 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तानवर 228 धावांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करून पहिल्या स्थानावर स्थानापन्न आहे . भारताने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानने 32 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. तर उर्वरित 2 फलंदाजांना दुखापत असल्याने ते बॅटिंगसाठी येऊ शकले नाहीत. अशा प्रकारे भारताचा ऐतिहासिक विजय झाला.
इंडियाकडून कुलदीप यादव याने 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी 1-1 विकेट घेतली. त्याआधी विराट कोहली-केएल राहुल या जोडीने नाबाद शतकी खेळी केली. तर रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. टीम इंडियाने या आधारावर 50 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 356 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना राखीव दिवशी सुरू आहे. पहिल्या दिवशी सामना २४ षटकानंतर थांबवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाला तेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली हे मैदानात होते. विराटने या सामन्यात शतक झळकावलं.. यासोबतच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा माइलस्टोन गाठला. वनडेमध्ये विराट कोहलीने १३ हजार धावा केल्या आहेत. विराटने कमी डावात ही कामगिरी करताना सचिन तेंडुलकरला याबाबतीत मागे टाकलंय. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेसुद्धा १३ हजार धावांचा टप्पा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गाठला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १३ हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ३२१ डावात १३ हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराट कोहलीने ही कामगिरी अवघ्या २६७ डावात केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत २७८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने ९० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने वैयक्तिक सर्वोच्च १८३ धावांची खेळी पाकिस्तानविरुद्ध साकारली होती. आतापर्यंत त्याने ४७ शतके आणि ६५ अर्धशतके केली आहेत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply