Ashok Chavan Resign : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाणार?

Ashok Chavan Resign : काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. काँग्रेस पक्ष सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेसपदाचा राजीनामा पत्रात त्यांनी माजी आमदार असा उल्लेख केलाय. यामुळे त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा दिला होता असं म्हटलं जातंय. अशोक चव्हाण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर राज्यातील काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसलाय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तब्बल ११ आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत. या ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. अजून काही मोठं मोठी नावे समोर येतील, तेही राजीनामे देतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तब्येत खालावली, डॉक्टरांना तपासणी करण्यासही दिला नकार

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची रविवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जात आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी 'भावी खासदार' असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply