Ashok Chavan : काँग्रेस सोडून भाजपात गेले, तेव्हा काय केलं; अशोक चव्हाण यांचा नाना पटोलेंना सवाल

Ashok Chavan : नाना पटोले हे देखील काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. तेव्हा नानांनी काय केलं होत. याचा विसर नाना पटोले यांना पडला आहे का? असा प्रतिसवाल खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे. 

काँग्रेसच्या  नावावर अशोक चव्हाण यांनी सत्ता उपभोगली. काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाणांचा प्लॅन होता असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला होता. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस बदल बोलणं टाळावं असा सल्ला देखील पटोले यांनी दिला होता. यावर अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना प्रतीउत्तर दिले. 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर, मराठा समाजाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार

नाना पटोले यांनी भाजपात  प्रवेश केला होता. त्याचे स्मरण त्यांनी अगोदर करावे, मग आम्हाला बोलावे; असेही चव्हाण म्हणाले. मी काँग्रेसबद्दल कधीही अपशब्द बोललेलो नाही. काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलं आहे; ही मी नाकारत नाही. मी सुध्दा काँग्रेस पक्षामध्ये काम करून भरपूर यश मिळवून दिलं आहे. हे सुधा तेव्हढेच खर आहे; असेही खासदार अशोक चव्हाण म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *