Ashadi Wari 2023 : 'माऊली, माऊली' च्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

आळंदी : विठ्ठल दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी राज्यभरातून आळंदीत दाखल झाले आहेत. वारकऱ्यांचे आगमन आणि ‘ज्ञानोबा- माउली’च्या जयघोषाने गेल्या चार दिवसांपासून अवघी अलंकापुरी दुमदुमली आहे. रविवारी (ता. ११) माउलींच्या पालखीचे प्रस्थान नियोजित वेळेआधीच करण्याचा मानस असून, देऊळवाड्यातून दुपारी चारच्या सुमारास आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले जाणार आहे.

प्रस्थान चार वाजता असल्याने भाविक दुपारी बारा वाजल्यापासूनच मंदिर परिसरात गर्दी करतात. सध्याच्या उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी प्रस्थान सोहळा मर्यादित वेळेत करण्याचा संस्थानचा मानस आहे, असे पालखी सोहळाप्रमुख ॲड विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करणे, खांदेकरी नियंत्रित संख्या, मंदिरात कमीत कमी लोकांना प्रवेश याबाबत वेळोवेळी बैठका घेत निर्णय घेण्यात आला.

माउलींच्या समाधी मंदिरात मंगळवारी पहाटे चार वाजता घंटानाद काकडा आरती झाल्यानंतर नऊपर्यंत भाविकांच्या महापूजा सुरू राहतील. दुपारी दोननंतर प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. यावेळी भाविकांना दर्शन बंद असणार आहे. मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. त्यानंतर माउलींच्या अश्वांचे मंदिरात आगमन होईल.

दुपारी चार वाजता गुरू हैबतबाबांच्या वतीने माउलींना आरती, त्यानंतर संस्थानच्या वतीने आरती होईल. त्यानंतर माउलींच्या चांदीच्या पादुका वीणामंडपात ठेवलेल्या पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानच्या वतीने मानाची पागोटी आणि हैबतबाबांच्या वतीने नारळ प्रसाद दिला जाईल.

ग्रामस्थांच्या वतीने वीणामंडपातील पालखी बाहेर आणल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून ती महाद्वारातून बाहेर पडेल. त्यानंतर नगरप्रदक्षिणा करून आजोळघरी समाजआरती झाल्यावर मुक्कामी राहील. त्यानंतर भाविकांना दर्शन सुरू राहील.

केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश

पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे म्हणाले, ‘‘यंदा प्रस्थानाला उशीर होऊ नये यासाठी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या ७५ इतकीच मर्यादित केली. खांदेकरी सव्वाशे, तर सोशल मीडिया पत्रकारांनाही मज्जाव केला आहे. केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी नैवेद्याच्या वेळी दर्शन बंद केले जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply