Ashadi Ekadashi 2023 : विठुमाऊलीच्या शुभाशीर्वादामुळेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून...; आषाढीच्या महापूजेचं निमंत्रण एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं

Ashadi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वीकारले. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीच्या सदस्यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी यात्रेच्या महापूजेचे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा वीणा आणि विठ्ठलाची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशी येत्या 29 जून रोजी साजरी होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.एकनाथ शिंदे यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाले आहे. गतवर्षी राज्यात अचानक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना विठुरायाची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला होता. 

आषाढी यात्रा काळात उष्माघात टाळण्यासाठी पहिल्यांदाच पंढरपुरात स्प्रिंकलरचा कलरचा वापर

दरम्यान, यंदाच्या आषाढी एकादशीला सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या दरम्यान भाविकांना उष्माघाताचा त्रास होवू नये यासाठी वारी काळात शहरात विविध ठिकाणी पाण्याचे फवारे बसविण्यात येणार आहेत. अशा प्रकारे फवारे पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहेत.

यंदा उन्हाचा आणि उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. यामध्ये यात्रा काळातील सोयी सुविधांवर चर्चा झाली. यामध्ये उष्माघाताचा संभाव्य धोका लक्षात घेवून गर्दीच्या ठिकाणी स्प्रींकलर (पाण्याचे फवारे) बसविण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार निवृत कर्नल सुपानीकर यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply