Ashadhi Wari : अश्व धावले वायुवेगाने ! रिंगण सोहळ्यात चैतन्य बरसात!

Ashadhi Wari : माळेगाव स्वागत कमानीलगत क्रेनच्या साहाय्याने पालखीरथावर झालेला फुलांचा वर्षाव, पंचायतीसमोर दर्शनासाठी स्वतंत्र ठेवलेली विठ्ठल-रुक्मिणीची पूर्णाकृती मूर्ती, मारुती मंदिरात पालखी ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला रिंगण सोहळा अनुभवता आला संत सोपानकाका महाराजांच्या पालखीवेळी
या वेळी ग्रामस्थानी पालखीचे स्वागत उत्साहात केले. माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे दुसरे अश्व रिंगण मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या रिंगणात अश्वाबरोबर वीणेकरी, टाळकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन धावणाऱ्या महिलांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी हरिनामाच्या जयघोषाबरोबर टाळ-मृदंगाच्या तालाने जोर धरला होता.

माळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, अमित तावरे, प्रदीप जाधव, माळेगावचे अध्यक्ष अड. केशवराव जगताप, रंजन तावरे, दीपक तावरे, अशोक सस्ते, वसंतराव तावरे, तहसीलदार गणेश शिंदे, प्रमोद जाधव, महेश कदम, अमित तावरे, प्रदीप जाधव आदीनी सोहळ्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Maharashtra Politics : मराठा ओबीसी वाद मिटणार? आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, शरद पवारांसह दोन्ही ठाकरेंना निमंत्रण

भैरवनाथ यात्रा उत्सव समिती, माळेगाव साखर कारखाना, राजहस सहकार सकुल, गकर सकुल, शरद सकुल, नंदन डेअरी आदींनी सोहळ्यासाठी योगदान दिले. वारकऱ्यासाठी मोफत जेवण, खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारले होते. मारुती मंदिरात सोपानकाकांच्या पालखीच्या मुक्कामाची सोय उत्तम झाली होती. विशेषतः संपूर्ण मारुती मदिर फुलानी सजविले होते.

भाविकांच्या दर्शनासाठी अमित तावरे, भरत कदम, प्रताप सातपुते, बाबाराजे पैठणकर, अजिज्य वाघमोडे, सचिन शिंदे, सुरेश भोसले, मोशन शेख, जयपाल भोसले, शिवराज, रोहन तावरे, प्रथमेश जाधव, स्वप्नील जाधव आदी मित्रमंडळाने उत्तम सोय केली होती. शिवाजी चौकात पालखीवर केनच्या सहाव्याने पुष्पवृष्टी केली. रागोळ्याच्या पायघड्या घातल्यामुळे परिसर अधिकच फुलून दिसत होता.
पणदरे येथे शिरखुरर्याचे वाटप

पणदरे येथे सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास सरपंच अजित सोनवणे, उपसरपंच मनोज जगताप, सत्यजित जगताप, विक्रम कोकरे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सोपानकाका महाराजांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करीत स्वागत केले. या वेळी अशोकराव मुळीक, प्रवीण कोकरे, अमित कोकरे, सचिन यादव, नितीन गायकवाड, विकास राजगुरू, कल्याण जगताप आदी पणदरेकरांसह नवमहाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच पणदरे-हनुमानवाडी येथील अमिनुद्दिन इनामदार यांच्यासह मुस्लिम बांधवांनी वारकऱ्याऱ्यांना मोफत शिस्खुरम्यचि वाटप केले. रविवारी (ता. ७) श्रीविठ्ठल माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या पालखी सोहळा उत्तमपद्धतीने पार पडल्याची माहिती नानासाहेब बापू जगताप, धुमाळवाडीचे सरपंच बाळासाहेब कोकरे यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply