Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, भक्तनिवासमध्ये अल्पदरात मिळणार नाश्ता आणि जेवण, मंदिर समितीनं हॉटेल घेतलं ताब्यात

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी  एक खुशखबर समोर आली आहे. मंदिर समितीच्या  भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले  आहे.  जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. अतिशय भव्य स्वरुपात उभारलेल्या या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविक निवास करु शकतात. अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या भक्त निवासामध्ये देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रतीचे चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे.

Beed Firing News : बीडमधील सरपंचाच्या हत्येचं धक्कादायक कारण; शरद पवार गटाच्या नेत्यासह ५ जणांविरोधात गुन्हा

भाविकांच्या खिशाला लागणारी कात्री होणार बंद 

कालपासून याची सुरुवात झाली असून भाविक येथील अल्पदरात मिळणाऱ्या आणि चांगल्या प्रतीच्या खाद्यपदार्थावर खुश असून मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. यासाठी मंदिर समितीचे येथे येणाऱ्या देशभरातील भाविकांना चहा , कॉफी , दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली असून जेवणाची थाळी तर केवळ 100 रुपयात ठेवल्याने भाविकांच्या खिशाला कात्री लागणे बंद होणार आहे. या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात. आता मंदिर समिती या भाविकांना चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ अतिशय अल्पदरात देणार आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply