Ashadhi wari 2023 : मोठी बातमी! पालखी सोहळ्याला गालबोट? आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद;

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज आळंदीमधून प्रस्थान होत आहे. मात्र मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं.

मंदिर व्यवस्थापनाने यावर्षी केवळ ७५ दिंड्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. टाळ भिरकावत वारकऱ्याने पोलिसांना प्रतिकार केल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेर ही घटना घडली आहे. काही काळ पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, आज सायंकाळी माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. काल देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं.

प्रस्थान चार वाजता असल्याने भाविकांनी दुपारी बारा वाजल्यापासूनच मंदिर परिसरात गर्दी केली. सध्याच्या उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी प्रस्थान सोहळा मर्यादित वेळेत करण्याचा संस्थानचा मानस आहे, असे पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करणे, खांदेकरी नियंत्रित संख्या, मंदिरात कमीत कमी लोकांना प्रवेश याबाबत वेळोवेळी बैठका घेत निर्णय घेण्यात आला.

केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश

पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे म्हणाले, ‘‘यंदा प्रस्थानाला उशीर होऊ नये यासाठी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या ७५ इतकीच मर्यादित केली. खांदेकरी सव्वाशे, तर सोशल मीडिया पत्रकारांनाही मज्जाव केला आहे. केवळ निमंत्रित पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी नैवेद्याच्या वेळी दर्शन बंद केले जाईल.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply