Ashadhi Ekadashi Wari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा; विठ्ठलनामाच्या गजराने पंढरपूर दुमदुमले

Ashadhi Ekadashi CM Eknath Shinde Maha Puja: 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) या दाम्पत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली.

काळे दाम्पत्य हे गेल्या २५ वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करतात. आज त्यांना महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची ही दुसरी पूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे घातले.

दरम्यान, विठुरायाच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह बुधवारी रात्री उशीरा पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी पंढरपुरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बुधवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांच्यासोबत वारकऱ्यांच्या रिंगणात फुगडी देखील खेळली होती

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply