Ashadhi Ekadashi : हिंदु - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक; आषाढी दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांचा निर्णय

Chhatrapati Sambhaji Nagar : आषाढी एकादशीला हिंदू मुस्लिम बांधवांच्या सामाजिक एकोप्याचे अनोखे दर्शन छत्रपती संभाजीनगर येथे नेहमीच पाहायवयास मिळत आहे. यंदा देखील हे नाते अधिक वृद्धींगत हाेणार आहे. याचे कारण म्हणजे आषाढी दिवशीच बकरी ईद हा सण आल्याने मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने दोन दिवस मास विक्री बंद असेल तसेच आषाढी एकादशी मुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा अनोखा निर्णय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.

हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम बांधव आषाढी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांचे स्वागत करणार आहेत. मुस्लिम बांधवांच्या या निर्णयामुळे हिंदू मुस्लिम बांधवांच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन या विठुरायाच्या प्रती पंढरपूर नगरीत पाहण्यास मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply