Asha Sevika Strike : संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन; प्रशासनाचा खळबळजनक निर्णय

Asha Sevika Strike : आशा सेविकांचा मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून राज्यव्यापी संप सुरु आहे. संभाजीनगर येथेही हा संप पुकारण्यात आला होता. या संपात संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील 511 आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. यापैकी ४४० आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्यात आलंय. 

आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील जवळपास 500 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांनी एक महिन्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. आरोग्यसेवेला वेठीस धरल्याबद्दल आशा स्वयंसेविकांनी 24 तासांत रुजू व्हावं, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मनपाकडून गुरुवारी नोटिसीद्वारे देण्यात आला होता.

Chhagan Bhujbal : मी माझी भूमिका बदलणारच नाही; जीवे मारण्याच्या धमकीनंतर मंत्री छगन भुजबळ कडाडले

आशा सेविकांना निलंबित करण्याचा निर्णय

काल प्रशासनानं नोटीस बजावल्यानंतर 71 स्वयंसेविका रुजू झाल्या होत्या. मात्र, उर्वरित 440 स्वयंसेविका रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे रात्री प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांना निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे आशा स्वयंसेविकांमध्ये मोठी खळबळ उडाली  आहे.

संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन झालं आहे. प्रशासनानं खळबळजनक निर्णय घेतल्यामुळे आशा सेविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेवकांचा गेल्या एक महिन्यापासून बेमुदत संपत सुरू होता.

आशा सेविकांना नोटीस

13 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक गोळी अभियान राबवण्यात येणार आहे. आशा सेविकांच्या संपामुळं या अभियानात मोठी अडचण येणार आहे. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त श्रीकांत चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहे. 24 तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा निलंबित केलं जाईल अशी अंतिम नोटीस त्यांनी आशा सेविकांना बजावली होती.

मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी आशा संघटनेचा राज्यव्यापी संपात महापालिकेच्या आरोग्य विभागातील 511 आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर कामावर हजर न झालेल्या आशा सेविकांना निलंबित करण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply