Asaram Bapu Gets Life Imprisonment: मोठी बातमी! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर कोर्टाचा मोठा झटका

Ahmedabad: स्वयंघोषित संत आसाराम बापूला गांधीनगर कोर्टाने मोठा धक्का दिला असून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे. काल कोर्टाने आसाराम बापूंना या संबंधात दोषी असल्याचे घोषित केले होते. ज्यानंतर आज हा मोठा निकाल दिला आहे. 

आसाराम बापूवर 2013 मध्ये अहमदाबादमधील मोटेराच्या एका शिष्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तर नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत.

काल या प्रकरणातील इतर सहा आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. याच प्रकरणात आता गांधीनगर कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे. यावेळी आसाराम बापूला न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादर केले होते.

शिष्येवरील बलात्काराचे हे प्रकरण २२ वर्षे जुने आहे. 2001 मध्ये सूरतस्थित आश्रमात एका शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. आसारामची शिष्य असलेल्या पीडितेने एकूण सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी गांधीनगरच्या सत्र न्यायालयात सुरू होती. 29 जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने आसाराम बापूंना दोषी ठरवले होते, तर अन्य सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

न्यायालयाने आसारामला कलम ३४२, ३५७, ३७६, ३७७ अंतर्गत दोषी ठरवले होते. या प्रकरणी अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. एसआयटीने जानेवारी 2014 मध्ये आसाराम आणि इतर सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये 101 साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply