Arvind Kejriwal: जेलमधून केजरीवालांनी दोन आदेश दिले? ईडीने दिले स्पष्टीकरण,'त्यांना सही करण्याची परवानगी...'

Arvind Kejriwal Orders From Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपुर्वी कथित दारु घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. अटकेत असताना केजरीवाल यांनी दोन आदेश दिले, अशा चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर या गोष्टीवरुन वाद वाढला होता. भारतीय जनता पक्षाकडून याबद्दल तक्रा करण्यात आली. त्यानंतर यावर ईडीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत आणि त्यांना सध्या सरकारी फाइल्सवर स्वाक्षरी करण्याची परवानगी नाही, अशी माहिती ईडीने दिली.

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, कोठडीत असताना, त्यांना दररोज संध्याकाळी पत्नी आणि वकिलांना भेटण्याची परवानगी आहे. मात्र त्यांना सरकारी फाईल पाहण्याची किंवा त्यावर स्वाक्षरी करण्याची परवानगी नाही. या बैठकीदरम्यान काही सह्या झाल्या का? याचा तपास ईडी करत आहे. तपासात कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास ते २८ मार्च रोजी न्यायालयासमोर ठेवण्यात येईल, असेही तपास यंत्रणेतील सूत्रांचे म्हणणे आहे.

दिल्ली सरकारने म्हटले आहे की कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या वतीने त्यांना दोन सूचना मिळाल्या आहेत.

Bade Miyan Chote Miyan चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगरच्या अ‍ॅक्शनने घातला धुमाकूळ

जलमंत्री अतिशी यांनी 24 मार्च रोजी सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या ताब्यात असताना त्यांना दिल्लीतील काही भागात पाणी आणि गटार संबंधित समस्या सोडविण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी, आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी त्यांना ईडी कोठडीतून दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे आणि चाचण्यांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सूचना पाठवल्या आहेत.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे तक्रार केली असून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने आदेश कसे जारी केले जात आहेत, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा गैरवापर होत असून त्यांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने आदेश काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याची तक्रारही त्यांनी ईडीकडे पाठवली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सूचना कोणत्या माध्यमातून मिळत आहेत हे दिल्ली सरकार किंवा आम आदमी पक्षाने अद्याप सांगितलेले नाही. या दोन्ही आदेशांपूर्वी केजरीवाल यांच्या पत्नीने त्यांचा एक संदेश दिल्लीतील जनतेला वाचून दाखवला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply