Arvind Kejriwal : चीनने कब्जा केलेली जमीन परत घेणार; केजरीवाल यांच्या १० गॅरंटी

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाकडून देशातील जनतेला १० गॅरंटी दिलीय. यासोबतच जनतेने आम आदमी पक्षाला केंद्रात निवडून दिल्यास देशाचा विकास १० वेगवेगळ्या मार्गांनी होईल, असा दावाही केजरीवाल यांनी केलाय. मुख्यमंत्री केजरीवाल हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी १० हमीपत्रे सादर केली.

गॅरंटी -१ देणार २४ तास मोफत वीज

देशाची विजेची मागणी २ लाख मेगावॅट आहे. आमच्याकडे ३ लाख मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे, मात्र खराब व्यवस्थापनामुळे वीजपुरवठा खंडित होतो. आपचे सरकार आल्यानंतर देशात वीज मोफत दिली जाईल. 1.25 कोटी रुपये खर्चून गरीबांना 200 युनिट वीज पुरवली जाईल. एका वर्षासाठी सव्वा लाख कोटी रुपये खर्च येईल, हा खर्च सरकार देणार तसेच गरिबांना २०० युनिट मोफत वीज देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केलीय.

Borivali News : मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक

दुसरी गॅरंटी

देशभरात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल. सरकारी शाळांचा स्तर उंचावला जाईल. देशातील सर्व सरकारी शाळा उत्कृष्ट बनवण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ५ लाख कोटी रुपयांचा खर्च येईल. यासाठी दरवर्षी ५० हजार कोटी रुपये खर्च होईल. हा खर्च अर्धा केंद्र आणि अर्धा राज्य सरकार उचलणार आहे.

तिसरी गॅरंटी

देशभरात मोहल्ला क्लिनिक चालू केले जातील. उपचारांचा दर्जा जागतिक दर्जाचा असेल. जो काही खर्च असेल, तो सरकार उचलेल."

चौथी गॅरंटी

चीनने आपल्या देशाच्या जमिनीवर कब्जा केलाय. पण केंद्र सरकार हे वास्तव लपवत आहे. आपल्या सैन्यात खूप ताकद आहे. चीनच्या ताब्यातील भारतातील सर्व जमीन मोकळी केली जाईल. एकीकडे राजनैतिक पातळीवरही काम केले जाईल तसेच लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल.

पाचवी गॅरंटी

अग्निवीर योजनेत नोकरी केल्यानंतर तरुणांना ४ वर्षांनंतर नोकरी सोडवी लागेल. यामुळे आपण लष्कराला कमकुवत करत असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केलीय. आप चे सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना बंद केली जाईल.

६ वी गॅरंटी

शेतकऱ्यांच्या पिकांना निश्चित दर दिला जाईल. जर जनतेने त्यांना निवडून केंद्रात आणले तर आम आदमी पक्ष स्वामिनाथन आयोग लागू करेल. त्यानुसार शेतकऱ्यांना एमएसपी मूल्य दिले जाईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

सातवी गॅरंटी

केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, अशी गॅरंटीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलीय.

आठवी गॅरंटी

वर्षभरात २ कोटी रोजगार निर्माण होतील. सर्व तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी तयार केले जाईल. रिक्त जागा सोडल्या जातील आणि परीक्षा निष्पक्षपणे घेतल्या जातील, अशी गॅरंटी यांनी दिलीय.

९ वी गॅरंटी

भाजप एक वॉशिंग मशीन असून त्याला भरचौकात आणून तोडलं जाईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याची योजना बंद पाडली जाईल. संपूर्ण देशाला भ्रष्टचारापासून मुक्त करू अशी गॅरंटीही केजरीवाल यांनी दिलीय.

१० वी गॅरंटी

भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल. आपल्या देशातील अनेक बडे उद्योगपती आपले व्यवसाय बंद करून परदेशात गेलेत, यामुळे देशाचे नुकसान होतंय. जीएसटी पीएमएलएमधून बाहेर काढून ते सुलभ केले जाईल. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो फारसा गुंतागुंतीचा बनवला जाणार नाही. इंडिया आघाडी आघाडीची चीनला व्यापारात मागे टाकण्याची योजना आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply