Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना पुन्हा झटका; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दिवसेंदिवस अडचणींमध्ये भर पडत आहे. आज राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.

सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना २६ जून रोजी अटक केली होती. सीबीआयने राऊस एव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांच्या चौकशीसाठी 5 दिवसांची कोठडी मागीतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती, त्यातून आज सुटका होणार होती. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने 20 जून रोजी दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.

Sharad Pawar : टीम इंडियाच्या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राईकशी, द्रविड गुरुजींचं कौतुक, शरद पवार वर्ल्डकप जिंकल्यानंतर काय म्हणाले?

सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयासमोर दोन अर्ज सादर केले होते. न्यायाधीश जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत केजरीवाल यांना 10 ते 15 मिनिटे कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. तर ईडी प्रकरणात अटक झाल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते, तेव्हा त्यांना वैद्यकीय कारणास्तव जी सूट मिळत होती ती भविष्यातही सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत.

सीबीआयने न्यायालयात बाजू मांडताना, केजरीवाल यांनी या प्रकरणात आधीच तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्यावर संपूर्ण प्रकरणाचा ठपका ठेवला आहे. केजरीवाल यांनी अबकारी धोरणाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितलंअसल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलं आहे. सीबीआयचे या आरोपांचं खंडन करत, मी सिसोदिया यांच्यावर कोणताही दोष ठेवला नाही, मी देखील निर्दोष आहे आणि सोसादियाही निर्दोष असल्याचं केजरीवाल म्हणाले.
 
 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply