Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला ; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली

Appasaheb Dharmadhikari : महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडला  आहे.

या महासोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती .  सकाळी साडेदहाच्या सुमारास या सोहळ्यला सुरुवात करण्यात आली होती. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले होते . सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते .

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती .

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापन, आरोग्य  शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य दिले आहे. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे जास्त महत्त्वाचे ठरते असा धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला. मानवता हाच धर्म असा लोककल्याणाचा मार्ग त्यांनी समोर ठेवला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply