Anil Deshmukh : अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातून आज, बुधवारी जामिनावर सुटका झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले आहे.

अनिल देशमुख मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले आहेत. अनिल देशमुख कारागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाण्याची शक्यता आहे. यानंतर ते वरळी येथील आपल्या सुखदा निवासस्थानी दाखल होणार आहेत. वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग व घराबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख हिवाळी अधिवेशन कामकाजात सहभागी होणार नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे. कोर्टाची मुंबई सोडण्याची परवानगी नसल्याने अधिवेशनात त्यांना सहाभागी होता येणार नाही. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *