Anil Desai : ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स; शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी काढल्याचा आरोप

Anil Desai : राज्यातील राजकारणातून मोठं वृत्त हाती आलं आहे . ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतरही ठाकरे गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. या प्रकरणी ईओडब्ल्यूकडे करण्यात तक्रार करण्यात आली आहे. 5 मार्च रोजी देसाई यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 

ठाकरे गटापुढे मोठा पेच उभा ठाकला आहे. ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यावर पक्षनिधी काढल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईओब्लूकडे तक्रार केली होती. यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणी अनिल देसाई यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Maratha Reservation : आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत कोणत्याच पक्षाला मतदान नाही, नगरमधील मराठा बांधवांचा निर्धार

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेनेची मान्यता दिली. त्यानंतर ठाकरे गटाने ५० कोटी रुपयांचा निधी काढला, असा आरोप शिंदे गटाने केला. अनिल देसाई यांना समन्स पाठवल्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पक्षनिधी काढण्यावर आता चौकशी होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणीच्या संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यालाही बोलावण्यात आलं होतं. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगणार आहे.

अनिल देसाईंची ५ मार्चला चौकशी होणार

शिवसेनेच्या पक्षनिधीवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पक्षनिधीतून ५० कोटी काढल्याचा आरोप शिंदे गटाने अनिल देसाई यांच्यावर केला आहे. शिंदे गटाच्या गंभीर आरोपानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवलं आहे. आता या प्रकरणी अनिल देसाई यांची ५ मार्चला चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी अनिल देसाई हे उपस्थित राहणार का, हे पाहावे लागेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply