Anganwadi Workers : मोठी बातमी! अंगणवाडी सेविकांच्या लढ्याला यश! मानधनात वाढ, सरकारसोबत सकारात्मक चर्चा...

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. यासंबधी आता महत्वाची बातमी समोर येत असून अंगणवाडी सेवाकांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली आहे.

सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार, मात्र त्यात कर्मचार्यांच्या व सरकार यांच्या सहभागाने ती होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे.

दरम्यान, मानधन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा अशा मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी २० फेब्रुवारीपासून संप सुरु केला होता. आज सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत..



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply