Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा १३ वर; एका चुकीमुळे घडली मोठी दुर्घटना

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशमध्ये रविवारी भीषण रेल्वे अपघात झाला. दोन ट्रेनची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला सरपंचाचा राजीनामा, मनोज जरांगेंना पाठिंबा

मिळालेल्या माहितीनुसार, ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०४ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल या दोन ट्रेनची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये दोन्ही ट्रेनचे आणि रूळाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ट्रेनच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या मार्गावर हा रेल्वे अपघात झाला तो हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो.

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विजियानगरम जिल्ह्यातील कंटकपल्ले येथे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला धडक दिली. त्यामुळे या ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरले. अपघातामागे मानवी चूक असल्याचे सांगण्यात येत

भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा रेल्वे अपघात अलमांडा आणि कंटकपल्ली रेल्वे स्थानकादरम्यान झाला. अपघातामुळे विजेच्या तारा तुटल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधारात झाला होता. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या या रेल्वे अपघातानंतर रेल्वेने १३ गाड्या रद्द केल्या. तर काहींच्या मार्गामध्ये बदल केला. या अपघातामुळे ट्रॅक ब्लॉक झाला. ज्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून ट्रेन धावू शकत नाही.आहे. विजियानगरम जिल्ह्याचे एसपींनी सांगितले की, या रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply