Andheri Crime News : कस्टम अधिकारी असल्याचं सांगत ९ कोटी रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

Andheri Crime News : मुंबईच्या  अंधेरी पश्चिम परिसरात फसवणूकीची एक मोठी घटना समोर आलीये. कस्टम अधिकारी आहे असं सांगत एका टोळक्याने तब्बल ९ कोटींची फसवणूक केलीये. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली असून २ जण फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेतायत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वेगवेगळी नावे धारण करून आणि स्वतःची ओळख कस्टम अधिकारी तसेच पब्लिक प्रॉसिक्यूटर असं सांगून व्यक्तींना लुबाडण्याचं काम एका टोळक्याने हाती घेतलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केलेलं सोनं लिलावात स्वस्तात उपलब्ध करून देणार असं आश्वासन देऊन टोळक्याने करोडोंची फसवणूक केली. या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत एका महिला आरोपीला अटक केलीये.

Hingoli Crime News : हिंगोलीत विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; महिलेच्या 'त्या' गुपिताचा आरोपींनी घेतला गैरफायदा

नूतन प्रसाद आयरे व त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून आरोपींनी तब्बल ९ कोटी ८६ लाख ५० हजार रुपये घेतले होते. स्वस्तात जास्तीत जास्त सोनं मिळवून देणार असं आश्वासन देत हे पैसे घेतले होते. मात्र फिर्यादींना सोनं किंवा गुंतवलेले पैसे देखील परत मिळाले नाही.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी एका महिला आरोपीला पुणे येथून अटक केलीये. तर तिच्या इतर दोन साथीदारांचा शोध नगर पोलीस घेत आहेत.

श्वेता अनिल बडगुजर (56 वर्षे) अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून दर्शन देसाई व स्वाती प्रकाश जावकर अशी दोन फरार आरोपींची नावे असून नगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply