Andheri By-Election: बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

 

मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला (Andheri By-Election) अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी आज 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. तर 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. 

सकाळी 7 पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ असणार आहे.

सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी 333 कंट्रोल युनीट, 333 बॅलेट युनीट व 359 व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली  जाणार आहेत. मतदान विषयक यंत्र सामुग्री व संबंधित मनुष्यबळ वाहून नेण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2 लाख 71 हजार 502 मतदार आहेत. यात 1 लाख 46 हजार 685पुरुष मतदार, 1 लाख 24 हजार 816 महिला मतदार तर एक तृतीय पंथीय मतदाराचा समावेश आहे. 256 मतदान केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत भाजपकडून ही निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु इतर अपक्ष आणि काही उमेदवारांनी या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारी कायम ठेवल्याने अंधेरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply