Amrit Bharat Station Scheme : 'अमृत भारत' योजनेत कोकणावर अन्याय; एकाही स्थानकांचा समावेश नाही,कोकणवासीयांची तक्रार!

मुंबई : 'अमृत भारत' योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ३८ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास होणार आहे.मात्र यामध्ये कोकणातील एकाही रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्यामुळे कोकणावर दरवेळी अन्याय का? असा प्रश्न आता विचारला जातो.

अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल २५ हजार कोटी रूपये खर्चून देशातील ५०८ स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

मात्र या विकास प्रकल्पात कोकण नेहमीप्रमाणे हरवले आहे. पहिल्या यादीत कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने कोकणातील प्रवाशांनी संताप व्यक्त केली आहे.

Jejuri Gadh Development : जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, १०९ कोटींच्या कामांचा शुभारंभ

कोंकण रेल्वे अजूनही भारतीय रेल्वेत समाविष्ट न केल्यामुळे मुंबई वगळता उर्वरित कोंकणाला अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेचा लाभ झालेला नाही. कोकणातील गोरेगाव रोड, सापे वामने, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी, कडवई, निवसर, वेरवली, सौंदळ, खारेपाटण या स्थानकांत उंच फलाटही नाहीत. वैभववाडीसारख्या महत्त्वाच्या स्थानकात दोन फलाटांना जोडणारा पूल नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.

निधीअभावी कोकण रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम वीरच्या पुढे जाऊ शकले नाही. शासनाच्या लेखी कोंकण भारतात येत नाही का? कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण कधी होणार? कोंकणाला भारतीय रेल्वेला अनुसरून येणारे लाभ कधी मिळणार?

- अक्षय मधुकर महापदी, कोकणातील रेल्वे अभ्यासक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply