
Amravati News : अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या सायन्स कोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या मैदनावर अमित शहा यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. 'परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी?', असा सवाल करत बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मैदानाच्या परवानगी प्रक्रियेवरून बच्चू कडू आणि पोलिस यांच्यामध्ये वाद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले होते. पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.
|
Mumbai News : धक्कादायक! शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार लंपास; चौघांवर गुन्हा दाखल |
परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याचे माहिती होताच पोलीसांनी सर्व गेट बंद केले. पोलिसांनी बच्चू कडू यांना गेटवरच थांबवले. अशामध्ये बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. 'पोलिस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत असे म्हणत अमित शहांनी कायदा तोडायला सांगितला का?', असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
यावेळी बच्चू कडू यांनी कायद्यापेक्षा माणसं मोठी नाहीत, असे म्हणत परवानगी आम्हाला मिळाली असल्याचे सांगितले. मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सायन्स कोर मैदानाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण बच्चू कडू या मैदानाच्या परवानगीवर ठाम आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


