Amravati News : कमानीचा वाद चिघळला; 27 पोलीस जखमी, 25 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल, प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे. प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 7 मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये अनेक पोलीस जमखी झाल्याची माहिती आहे.

जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा मारा केला. आज परिसरात शांतता असून सर्वांनी शांतता राखावी. जो कायदा घेणार त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे. 

Rahul Gandhi : राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आज महाराष्ट्रात, कसा असेल मार्ग?

दोन गटात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असं देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले आहे. तसेच ज्यांनी कायदा हातात घेतला दगडफेक केली, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे. 

प्रकाश आंबेडकर अमरावती दौऱ्यावर

काल झालेल्या दगडफेकीत 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. 25 आणि अधिक लोकांवर दंगलीचे आणि सरकारी मालमत्तेच नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालच्या राड्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अमरावती दौऱ्यावर येणार आहे. लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या लोकांची ते भेट घेणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply