Amravati Nagpur Highway Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कॉलेजला निघालेल्या तरुणीला ट्रकने स्कूटीसकट फरफटत नेलं

Amravati Nagpur Highway Accident: अमरावती-नागपूर महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कॉलेजला निघालेल्या तरुणीच्या स्कुटीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने स्कूटीला २० ते २५ फूट फरफटत नेलं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ट्रकने धडक दिल्यानंतर स्कूटीवरून दूर फेकल्या गेल्याने तरुणीचा जीव वाचला आहे. मात्र, या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन करत तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त तरुणी ही स्कूटीवरून कॉलेजला निघाली होती. अमरावती-नागपूर महामार्गावरील हॉटेल गौरी इन जवळ ती आली असता, समोर नागपूर वरून येणाऱ्या एका ट्रकने तिच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी बाजूला फेकली गेली. त्यानंतर ट्रकचालकाने स्कूटीला तब्बल २० ते २५ फूट दूर फरफटत नेले.

या भीषण अपघातात  स्कुटीला चेंदामेंदा झाला. मात्र,बाजूला फेकल्या गेल्याने तरुणीचा जीव वाचला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन करत तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply