Amravati Corporation : थकित मालमत्ता कर धारकावर आजपासून जप्तीची कारवाई; अमरावती महानगरपालिका ॲक्शन मोडवर

Amravati : आर्थिक वर्ष समाप्तीवर असल्याने थकीत कर वसुली करण्याची मोहीम आता तीव्र करण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचललेले आहे. आजपासून महापालिकेने वसुली मोहीम तीव्र करत शहरातील बड्या थकबाकीदार मालमत्ता धारकावर जप्तीची कारवाई पोलीस बंदोबस्तासह केली जाणार आहे.

राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांकडून थकीत कराची वसुली करण्यात येत आहे. आर्थिक वर्षातील थकबाकीसह मागील काही वर्षात कर भरणा न करणाऱ्या बड्या थकबाकीदारांकडून देखील वसुली करण्यात येत आहे. अमरावती महापालिकेने देखील आपली वसुली मोहीम तीव्र केली असून थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीस बजावत कर भरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार ३८६९ मालमत्ता धारकांना महानगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.

Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; सोलापूर शहरातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निर्णय

शासकीय कार्यालयांकडे देखील थकीत कर

धक्कादायक म्हणजे अमरावती महापालिका हद्दीत असलेल्या ८४ शासकीय कार्यालयाकडे बड्या रकमा मालमत्ता करापोटी थकीत आहेत. महापालिकेने या कार्यालयांकडे वारंवार विनंती करून सुद्धा मालमत्ता कर न भरल्याने आजपासून थेट अमरावती महानगरपालिका त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई करणार आहे. त्यामुळे तातडीने महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा अस आवाहन करण्यात आले आहे.

१८८ कोटी वसुलीचे उद्दिष्ट

दरम्यान आर्थिक वर्ष समाप्तीस एक महिन्याचा कालावधी राहिला आहे. यामुळे मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती महापालिकेने १८८ कोटी रुपयांची थकीत वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून ३१ मार्चपूर्वी ही रक्कम जमा करण्याचे टारगेट आहे. मात्र अमरावती महानगरपालिकेत मालमत्ता कराची वसुलीच होत नाही; असे चित्र असल्याने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply