Amravati Airport : अमरावती विमानतळाचे उद्घाटन झालं, पण २४ तासांत नामांतराचा वाद पेटला

Amravati Airport : बहुप्रतिक्षित असलेल्या अमरावती विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला मोठ्या थाटात उद्घाटन झाल. मात्र उद्घाटनाच्या वेळी विमानतळ नामांतरांचा वाद चांगलाच उफाळून आला आहे. यानंतर नामकरणाचा हा वाद आता चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे.

मागील काही वर्षांपासून अमरावतीचे विमानतळ कधी सुरु होणार? याची प्रतीक्षा लागून होती. यामुळे बहुप्रतीक्षित असलेल्या विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. मात्र यानंतर नामकरणाचा वाद उफाळून आला आहे. अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी असताना प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचे नाव समोर आले. तर अधिकृत घोषणा न होता विमानतळ व विमान कंपनीने चक्क प्रचंड घोडचूक करत अमरावतीकरांच्या भावनांशी खेळ चालू असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटले आहे.

Bhandara Crime : चोरीच्या संशयातून ग्रामस्थांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू; हत्येप्रकरणी १४ जणांना पोलीस कस्टडी

तर मोठे आंदोलन उभारणार : खासदार वानखडे

गुलाबराव महाराज यांच्याप्रती कुठली नाराजी नाही, ते आदरणीय आहेत. परंतु पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीमध्ये अमरावती विमानतळ आहे. देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख होते. घटना समितीत सुद्धा सदस्य होते. पंजाबराव देशमुख यांचे काम मोठे आहे. यामुळे विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे. पंजाबराव देशमुख यांचे नाव न दिल्याने अनेक लोकांची मन दुखावले आहे. नाव न दिल्यास येणाऱ्या काळात मोठ आंदोलन होणार; असा इशारा खा. बळवंत वानखडे यांनी दिला.

लवकरात लवकर तोडगा काढा

तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढा व दोन पैकी कुठलही एक नाव द्या. एका चुकीमुळे लोकांच्या भावना दुखावला जात आहे. नावाचा संभ्रम दूर केला पाहिजे; अशी मागणी राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी केली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply