Amravati Dengue Update : अमरावतीत डेंग्यूचा विळखा वाढला; जिल्ह्यात महिनाभरात आढळले १०० रुग्ण

Amravati : अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा वाढला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात गेल्या महिनाभरात हे प्रमाण अधिक वाढले असून जिल्ह्यात मागील ३६ दिवसात १०० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव झपाट्याने वाढत असतो. सध्या सर्वत्र व्हायरल इन्फेक्शनने अनेकजण तापाने फणफणले आहेत. याशिवाय डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजाराची साथ देखील पसरली आहे. दरम्यान अमरावतीमध्ये डेंग्यूचा (Dengue) डंख अनेकांना बसला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून रुग्णालयांमध्ये देखील गर्दी वाढत आहे. यामुळे नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित साफ करावी, एक दिवस कोरडा पाळणे आवश्यक असून रुग्णांना लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावा; असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

Pune Ganeshotsav 2024: पुण्यनगरी सजली! ढोल ताशांचा गजर अन् ऐतिहासिक देखावे; ५ मानाच्या गणपतींची वैभवशाली परंपरा, यंदाची तयारी कशी? जाणून घ्या..

अमरावती शहरात १२६ रुग्ण

अमरावती (Amravati) जिल्ह्यासह शहरातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात मागील ८ महिन्यात तब्बल १२६ तर मागील ३६ दिवसात १०० डेंगूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर उर्वरित जिल्हाभरामध्ये आठ महिन्यात १३५ रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात १ जानेवारी ते ५ सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एकूण २६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply