Amit Shah Pune Visit: अमित शहांच्या पुणे दौऱ्यावेळी मोठा बदल! कार्यक्रमानंतरच्या सर्व बैठका रद्द; तातडीने दिल्लीला जाणार

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह काल संध्याकाळी पुण्यात दाखल झालेत. अमित शहा यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी राखीव वेळ ठेवला होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

Chandrayaan 3 Update: 'चांद्रयान-३'चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, इस्रोने ट्वीट करून दिली माहिती

अमित शाह यांच्या दौऱ्यात बदल झाला आहे. कार्यक्रम संपवून शाह डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. तिथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह तातडीने दिल्लीला जाणार आहेत. यामुळे या बैठका सकाळी ११ वाजताच सुरु झाल्या आहेत.

अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply