Amit Shah Pune Visit : पीएम मोदींनंतर अमित शाह पुणे दौऱ्यावर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वागताला

Amit Shah Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडेच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.

पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.

आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा होणार नसल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र शाह यांच्या या दौऱ्यात युती सरकाराच्या मंत्रिमंडळ विस्तारावाबाबत चर्चा होऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

Gaurikund Landslide : गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, ३ जणांचा मृत्यू; प्रशासनाचे सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन

कसा असेल अमित शाह यांचा दौरा?

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार , 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सहकार से समृद्धी " या संकल्पनेत ठाम विश्वास दर्शवत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या अनुषंगाने , सहकार क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply