Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Amit Shah  : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाचा व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच भाजपवर जोरदार टीका होऊ लागली. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजप नेत्यांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांनी याबाबत एफआयआर नोंदवला आहे. गृहमंत्र्यांच्या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांना 2 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये एक तक्रार भाजपने केली होती, तर दुसरी तक्रार गृह मंत्रालयाने केली होती. तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल सायबर विंग IFSO युनिटने एफआयआर नोंदवला आहे.

अमित शाहांच्या एका व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा भाजपने आणि गृह मंत्रालयाने केला आहे. यानंतर एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एडिट व्हिडिओमध्ये गृहमंत्री अमित शाह एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य करताना दिसत आहेत. भाजपने या एडिटेड व्हिडिओबाबत देशभरात एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप आणि गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपीसीच्या कलम १५३/१५३ए/४६५/४६९/१७१जी आणि आयटी कायद्याच्या कलम ६६सी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

KKR Vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

भाजपने देशभरात एफआयआर दाखल करण्याचा घेतला निर्णय

भाजपमधील सुत्रांनी 'आज तक'या हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत काहीही बोलले नाही आणि हा व्हिडिओ खोटा आहे. ते मुळातच म्हणाले होते की, सरकार स्थापन होताच भाजप मुस्लिम समाजाला दिलेले असंवैधानिक आरक्षण काढून टाकेल. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आम्हाला देशाच्या विविध भागातून तक्रारी येत आहेत आणि या सर्व तक्रारींवर एफआयआर नोंदवले जातील.

व्हिडिओ खोटा असल्याचा भाजपचा दावा

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत भाजपने म्हटले आहे की, अमित शाह  यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण संपवण्याबाबत काहीही बोललेले नाहीत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा आहे. मूळ व्हिडिओमध्ये अमित शाह यांनी तेलंगणातील मुस्लिमांसाठी "असंवैधानिक" आरक्षण हटवण्याबाबत चर्चा केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दिल्ली पोलिसांनी फेसबुक आणि एक्सकडून मागवली माहिती

गृहमंत्र्यांच्या एडिट व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांनी एक्स आणि फेसबुकला पत्र लिहिले आहे. तसेच हा एडिट केलेला व्हिडीओ कोणत्या अकाउंटवर टाकण्यात आला आहे, याची माहिती दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागवण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणाचा व्हिडीओ एडिट करून अज्ञाताने सोशल मीडियावर व्हायरल केला. "आमची सत्ता आल्यानंतर SC, ST आणि OBC यांचं आरक्षण आणलं जाईल", असं अमित शाह व्हिडीओ म्हणताना दिसून येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply