Amit Shah : राहुल गांधींनी कलम 370 हटवण्यास विरोध केला होता, अमित शाहांनी सांगितली संसदेतील ती घटना

Amit Shah : ''मी संसदेत ३७० रद्द करण्यासाठी विधेयक मांडत असताना राहुल गांधी मला म्हणाले, कलम ३७० हटवू नका. मी त्यांना विचारलं का, तर ते म्हणाले, असं केल्यास रक्तपात होऊ शकतो. मात्र आज पाच वर्षे झाली आणि काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. दगडफेक करण्याचे धाडसही कोणी केले नाही'', असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

आज अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रामदास तडस यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''गेल्या १० वर्षात मोदीजींनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे.. मोदीजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले गेले. बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिराचा कॉरिडॉर बांधण्याचे काम केले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आलं.''

Maharashtra Politics : वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे: पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसवर हल्लाबोल करत ते म्हणाले,''निवडणुकीत भाजपने ४०० जागा जिंकल्या तर आरक्षण हटवले जाईल, असा दावा करत काँग्रेस खोटारडेपणा पसरवत आहे. मी स्पष्ट करतो की भाजप आरक्षण रद्द करणार नाही आणि करू देणारही नाही. ही मोदींची गॅरंटी आहे. या देशातील जनतेने आम्हाला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply