Ambajogai Bus Accident : बुट्टेनाथ घाटात एसटी बसचा भीषण अपघात; २० ते २५ प्रवासी जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

Ambajogai Bus Accident : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या, बुट्टेनाथ घाटात, एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. घाटातील अरुंद रस्त्यामुळे चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल खड्ड्यात कोसळली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बस उलटल्याने २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सदरील बसअंबाजोगाई येथून मोरफळी दिशेने जात होती. बुट्टेनाथ घाटात, आल्यानंतर अरुंद रस्त्याचा अंदाज चालकाला आला नाही. काही कळण्याच्या आतच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली.

मागील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरला अपघात झाला होता. यामध्ये लहान मुलाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर रस्त्याच्या रूंदीकारणासाठी मागणी करण्यात आली होती. 

या मागणीनंतर घाटातील रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संबंधित गुत्तेदाराकडून अगदी संत गतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. त्यामुळं बसचा अपघात झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गणेश सरोदे, अधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्यासह तहसील ,पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply